भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी, माहुर
माहुर तालुक्यातील मौजे माहादापुर येथे अतिवृष्टीने दि.२१व२२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने गावा लगत असलेल्या नाल्याला भयंकर पुर आल्याने गावात पाणी शिरले व नागरिकांची घरे पड झड होवून वाहुन गेली संसार उपयोगी भांडी अन्नधान्य पांघरुन वाहुन गेले आम्ही जिल्हा परिषद शाळेत राहत आहो आम्हाला पुढील उदरनिर्वाहासाठी मदत करावी अशी विनंती मानिय तहसीलदार साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सोबत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादाराव गायकवाड,हीरासिंग चव्हाण,गणेश खडसे, सुनील राठोड, ज्ञानेश्वर वैरागडे, विनोद विटेवार, सिद्धार्थ हरणे,विजेय भगत इत्यादी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन दिले आहे.











