भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव:-शेवगाव तालुक्यात आबासाहेबांनी उभारलेल्या ज्ञान मंदिरात गरीब कष्टकरी आणि बहुजन समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर जात आहेत आणि जात राहतील हे सर्व शक्य झाले ते आबासाहेब काकडे यांच्या प्रयत्नातून असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ होडशीळ गुरुजी यांनी एफ डी एल शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने ढोरजळगाव येथे मांडले.
श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ उर्फ आबासाहेब कान्होजी काकडे यांचा 104 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरवातीला ढोरजळगाव गावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम व कर्मयोगी आबासाहेब काकडे तसेच स्व निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य संजयजी चेमटे यांनी आपल्या प्रास्ताविकात आबासाहेबांच्या जयंती निमित्त पुढील एक महिना जयंती महिना म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.विद्यालयाचे माजी प्राचार्य विक्रमराव उकिर्डे यांनी विद्यालयाच्या पहिला विद्यार्थी ते प्राचार्य हा प्रवास कर्मयोगी आबासाहेब आणि स्व निर्मलाताई यांच्या सोबत काही काळ करता आला आणि आयुष्याचे सोने झाले असे मत मांडले,यावेळी विद्यालयाचे संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यातला दुष्काळ दूर व्हावा व शेतीसाठी पाटपाणी यासाठी आबासाहेबांनी केलेला संघर्ष आपल्या मनोगतातून मांडला.विद्यालयातील विद्यार्थिनी स्वाती बकाल,सृष्टी देशमुख व श्रेया फसले यांनी आबासाहेबांचे संक्षिप्त जीवनचरित्र सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमासाठी जगन्नाथ होडशीळ,विक्रमराव उकिर्डे,देविदास पाटेकर,डॉ सुधाकर लांडे,गणेश कराड,अनंता उकिर्डे,देविदास गिऱ्हे,पांडुरंग गरड,भिवसेन केदार,बाबासाहेब कराड,रज्जाकभाई शेख,डॉ विश्वासराव जायभाये,महादेव पाटेकर,विश्वासराव वांढेकर,रोहन साबळे,पांडुरंग सांगळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास देशमुख यांचेसह विद्यालयाचे प्राचार्य श्री.चेमटे सर पर्यवेक्षक श्री.सुनील जयभाये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ईश्वर वाबळे यांनी तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.सुनील जायभाये यांनी मानले.