कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : आज दी. 26 जानेवारी रोजी पुसद येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन प्रज्ञापर्व समिती2022 च्या वतीने साजरा करण्यात आला.सर्वप्रथम भारतरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्यास् पुष्पहार अर्पण करून घटनेच्या प्रमुख शिल्पकारास विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेबांचा विजय असो, भारतीय प्रजासत्ताक दिन चिराउ हो अशा घोषणा देण्यात आल्या.व प्रजासत्ताक दिनाच्या समस्त भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित, प्रज्ञापर्व समिती 22 चे अध्यक्ष विठ्ठल खडसे सर, कार्याध्यक्ष अशोक भालेराव, उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेश ढोले, राजेंद्र नाईक, संघटक प्रमोद धुळे पत्रकार कैलास श्रावणे संतोष अंभोरे,भारत कांबळे मुन्ना हाटे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेवराव भगत, कांबळे सर सामाजिक कार्यकर्ता इंगोले,किशोर भगत शुभम श्रावणे जय श्रावणे इत्यादी मान्यवर तथा समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.