Blood Sugar Level Chart: ‘आरोग्यम् धनसंपदा’ अशी म्हण प्रचलीत आहे. आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे, या वाक्यामुळे अधोरेखित होतं. आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं तर, मधुमेह हा शरीराला जडणारा सर्वात घातक आजार आहे.
या आजारामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खाण्यापिण्याच्या सवयींवर या आजारांमुळे बंधनं येतात. तसेच या आजारामुळे इतर आजार देखील बळावतात. त्यामुळे मधुमेह म्हंटलं की नको रे बाबा, असं म्हणावं लागेल. मधुमेहाचा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही. हा आजार झाल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. त्याचे नियमित निरीक्षण करावे लागते.
जर तुम्हाला मधुमेह झाला असेल जास्त घाबरण्याची गरज नाही. तुमच्या आहारात काही बदल करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या वयात कोणाच्या रक्तातील साखरेची पातळी किती असावी.
वय वर्षे 1 ते 49 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी
1 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांची रक्तातील साखरेची पातळी 110 ते 200 mg/dL या श्रेणीत असावी. त्याच वेळी, 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये, रक्तातील साखरेची पातळी 100 ते 180 mg/dL च्या श्रेणीत असावी. याशिवाय 13 ते 19 वयोगटातील लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी 90 ते 150 mg/dL असावी. 19 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये, रक्तातील साखरेची पातळी 90 ते 150 mg/dL च्या दरम्यान असावी.
50 वर्षे ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी
50 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्यांना मोठी समस्या उद्भवू शकते. या वयात लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीची विशेष काळजी घ्यावी लागते. 50 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये फास्टिंग असताना रक्तातील साखरेची पातळी 90 ते 130 mg/dL असावी. याशिवाय, दुपारच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 140 mg/dl पेक्षा कमी असावी. या वयातील लोकांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 150 mg/dl पर्यंत असणे आवश्यक आहे.
60 वर्षांवरील व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी 90 ते 130 mg/dL च्या फास्टिंग रेंजमध्ये असावी. त्याच वेळी, झोपताना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 150 mg/dL पेक्षा जास्त नसावी.
फास्टिंगमध्ये रक्तातील साखरेची पातळी किती असावी?
सामान्य प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सकाळी रिकाम्या पोटी 70-100 mg/dl असावी. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 100-125mg/dl च्या दरम्यान असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्याच वेळी, रक्तातील साखरेची पातळी 126mg/dl पेक्षा जास्त असणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्याचा अवलंब करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.