विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला: तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक गावामध्ये, कुणाच्या घरामध्ये, कुणाच्या अंगणामध्ये, शेतामध्ये असे कित्येक वेळा गांजाचा व्यवसाय करणारे आणि आपल्याच धारांमध्ये अंगणामध्ये जिवंत झाडे जगून आपला व्यवसाय चालवल्या जात आहे. अशा कित्येक गांजा तस्करांना पोलिसांनी वेढा घातला आहे.
आता ताजे उदाहरण म्हणजे दि१२ मे रोजी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर लगेच पिंपळगाव चांभारे येथील एका शेतातील ५ ते ६ फुटाची तीन जिवंत झाडे पोलिसांनी ताब्यात घेतले व आरोपी सुभाष जणपत राठोड
वय वर्षे ६० याला अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार पिंपळगाव चांभारे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजाची लागवड केली आहे अशी गुप्त माहिती मिळतात पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व पथक त्याठिकाणी रवाना झाले व शेताची पाहणी केली असता
त्यांना जिवंत तीन झाडे आढळून आले ती झाडे ओपन पोलीस स्टेशनला आणल्या नंतर त्याचे मोजमाप करण्यात आली त्या गांजा चे वजन केले असता
८ किलो ३८० ग्राम आढळून आला . त्याचे अंदाजे किंमत
एवढी आहे . पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील कित्येक ठिकाणी गांजाची तस्करी करणाऱ्या मिळाले. काही आरोपी जल मध्ये तर काही आरोपी फरार आहेत.
पिंजर पोलीस स्टेशन बेधडक कारवाया केल्या आहेत.
तरीसुद्धा आरोपींना पोलीस कळले नाही. आरोपी सुभाष राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे धडक कारवाई ठाणेदार अजयकुमार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम, हेड कॉ, बेलोरकर, हेड कॉ, राजू वानखेडे, चंद्रशेखर गोरे यांनी ही कारवाई केली आहे.










