शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम दिवठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारामधून गावाला पुरवठा करणारी तारे गेलेली आहेत, ते काढण्या करीता मुख्याध्यापिका का व शाळा समिती अध्यक्ष विलास बोचे यांनी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन दोन ते तीन वेळ निवेदन दिले त्या मध्ये तार शाळा आवाराच्या बाहेरून काढावे किंवा तिथं तार काढून केबल टाकण्यात यावा नाहीतर एखादी मोठी जिवित हानी होण्याची भीती आहे.त्याकरिता तिथं लवकरात लवकर तार शाळा आवारा मधून काढून टाकावेत
आज 12 तारखेच्या मध्ये रात्री जिवंत तार तुटून खाली पडला बर झाल शाळेला सुट्या लागल्या असल्या मुळे फार मोठी जिवित हानी टळली सकाळी मुख्याध्यापिका शाळे मध्ये नवीन ॲडमिशन करीता आल्या असता त्यांना
जिवंत तार तुटलेली निदर्शनास आली असता त्यांनी शाळा समिती अध्यक्ष व गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली व लगेच गावातील Dp वर जाऊन Dp बंध करण्यात आली त्यामुळे फार मोठी जिवित हानी टळली आतातरी महावितरणे ते तार तातडीने हटवावेत नाहीतर मुलांना शाळे मध्ये पाठवणार नाही हा निर्णय शाळेत शिकायला जाणाऱ्या मुलांच्या आई वडील व गावातील गावकऱ्यांनी घेतला आहे.