अकोला,दि.1- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 246 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 245 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि. 31) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57822(43225+14420+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 313741 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 310156 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3183 नमुने होते. आजपर्यंत एकूण 313741 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 270516 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
एक पॉझिटिव्ह
आज दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.
15 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57822(43225+14420+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56671 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.