आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी रायगड
पाली : ( परळी ) निपुण महाराष्ट्र अभियांनांतर्गत विशेष शिक्षण परिषदेचे रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात घेण्यात आले. या मध्ये सुधागड तालुक्यातील परळी केंद्र तसेच चंदरगाव केंद्र या दोन्ही केंद्राची शिक्षण परिषद परळी येथे केंद्र प्रमुख श्री. घनश्याम हाके साहेब यांचा मार्गदर्शना खाली पार पाडण्यात आली. सदर संपूर्ण महाराष्ट्रात निपुण भारत हा उपक्रम मार्च ते जून महिन्या पर्यँत इयत्ता 3 री ते 5 वी या इयत्ते करीता भाषा आणि गणित विषयात विध्यार्थ्यांना निपुण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असुन त्या मध्ये निपुण महा अभियान कृती कार्यक्रम अंमलबजावणी व नियोजन करुन इयत्ता 3 री ते 5 वी च्या वर्गाचा अध्ययनस्तर घोषित करणे निपुणमाता, SMC सदस्य समाज सहभागा बद्दल मार्गदर्शन करणे तसेच उन्हाळी सुट्टीत अभ्यासमित्र व वाडी – वस्तीत, सोसायटीत निपुण अभ्यास कट्टा निपुण ताई, निपुण दादा मार्गदर्शन घेऊन विध्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणे या परिषदेचे महत्वाचे धोरण असुन मुलांना भाषा, गणित विषयात विशेष स्तरावर नेऊन त्यांचे लेखन, वाचन सुधाणारे आणि अभ्यासातील काठीण्या पातळीवरून त्याला अध्ययन अध्यापन क्षमतेत सक्षम करणे म्हणजे निपुण करणे हेच या निपुण अभियानाचे महत्व आहे असे शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करणारे श्री. विष्णु राठोड सर, दारकुंडे सर, सचिन कदम सर, जेधे सर, श्रीमती प्रिया कळमकर, श्री. संदीप म्हात्रे सर, श्रीमती. रत्नमाला माने मॅडम, सौ. शिंदे मॅडम, हेमा पोपट, गिरी मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले सदर शिक्षण परिषद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणातमा. केंद्रप्रमुख हाके साहेब तसेच दोन्ही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदर परिषदेस परळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अहिरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.


