पवनकुमार भोकरे
तालुका प्रतिनिधी पाटोदा
पाटोदा : सोनदरा गुरुकुल, डोंबरी तालुका पाटोदा यांच्या वतीने आयोजित सुवर्णकन्या स्पर्धा परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पाटोदा येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.ग्रामीण भागातील मुलींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीक्षेत सहभागी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सोनदरा गुरुकुल, डोंबरी संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. परीक्षेनंतर गुणवंत विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये स्पर्धात्मक परीक्षांबद्दल जागरूकता वाढली असून, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


