मुलींना व महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला देणार – अँड सौ.पवार
मनोज बिरादार ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
देगलूर -अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने महिलांचे आरोग्य व स्त्री हक्क कायदे याविषयी जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न झाली. प्रस्तुत कार्यशाळेत डॉ. गीता रेखावार यांनी ‘बदलती जीवनशैली व स्त्री आरोग्य’ या विषयावर , अॅड. सुरेखा विशाल पवार यांनी ‘स्त्री हक्क संरक्षणविषयीचे विविध कायदे’ व अॅड. पल्लवी डावखरे (कळसकर) यांनी स्त्री शोषणविरोधी कायदे या विषयावरील व्याख्याने संपन्न झाली. या कार्यशाळेत आरोग्यविषयक व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , डॉ. विनय भोगले , डॉ. गीता रेखावार, अॅड. सुरेखा पवार व अॅड. पल्लवी डावखरे (कळसकर) व संयोजक प्रा डॉ. किशन सुनेवार हे मंचावर उपस्थित होते.प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी महिलांच्या आरोग्य, स्त्री हक्क संरक्षणविषयीचे विविध कायदे आणि – स्त्री शोषणविरोधी कायदे याअनुषंगाने विद्यार्थिनीमध्ये मुक्त चर्चा व्हावी, अनेक शंका दूर होणे गरजेचे आहे, यासाठी अशा कार्यक्रमातून चिंतन आणि चर्चा घडावी याबद्दल अपेक्षा व्यक्त केली. डॉ. गीता रेखावार यांनी ‘बदलती जीवनशैली व स्त्री आरोग्य’ या विषयाच्या अनुषंगाने महिला शोषित जीवन जगताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. मोबाईल आणि संगणक यांचा योग्य वापर करून निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आत्मसात करावी, असे म्हंटले. अॅड. सुरेखा पवार यांनी “स्त्री हक्क संरक्षणविषयीचे विविध कायदे व अॅड. पल्लवी डावखरे (कळसकर) -स्त्री शोषणविरोधी कायदे” या विषयावर मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरणासाठी भारतीय संविधान हे वरदान ठरले असून महिलांनी निर्भयतेने सामोरे गेले पाहिजे. प्रस्तुत कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले , व सूत्रसंचालन डॉ परवीन शेख व आभार प्रा विशाखा नाईक यांनी मानले.

