नागोराव शिंदे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रथम च शेतकऱ्यांच्या पिक विमा शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा संदर्भात प्रश्न मांडल्यामुळे हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.असल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे. शेतकऱ्यांना पिकाचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढला जातो. परंतु पिक विमा कंपनीकडे मनुष्यबळ कमी असते त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपावर नेमणूक केलेल्या काही लोकांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचा सर्वे केला जातो.परंतु ते लोक ज्या शेतकऱ्यांनी त्यांना पैसे दिले त्या शेतकऱ्यांचा सर्वे करूनत्यांना मोबदला मिळवून दिला जातो. परंतु एकाच सर्वे नंबर मध्ये एका शेतकऱ्यांना मोबदला मिळतो तर दुसऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही यासाठी बाबुराव पाटील कदम यांनी सभागृहातील अध्यक्षांना व सभागृहांना विनंती केली की हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात २५ वरून ५० टक्के अग्रीम अनुदान द्यावे ही मागणी करून कंपनीला धारेवर धरले. पिक विमा मिळावा यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन उपोषण रास्ता रोको केले परंतु त्यांची दखल कुणीच घेतली नाही. व अतिवृष्टी अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे
तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा व अतिवृष्टी अनुदान जमा करावे आणि शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी हादगाव हिमायतनगर विधानसभेत ५० ट्रान्सफॉर्मर चि तरतूद करून द्यावी अशी मागणी त्यांनी सभागृहामध्ये केल्यामुळे तालुक्यासह महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची बाजू मांडून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांतून त्यांचे कौतुक होत आहे. पिक विमा मिळावा म्हणून आम्ही अनेक वेळा आमरण उपोषण आंदोलन रास्ता रोको केले. पण कंपनीने कधी दखल घेतली नाही परंतु हाच प्रश्न आमदार बाबुराव पाटील कदम कोहळिकर यांनी सभागृहामध्ये मांडला त्याबद्दल मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवाकडून त्यांचे आभार व्यक्त करतो असे योनी पळसपुर येथील विनायक सुर्यवंशी यांनी सागीतले आहे.