संतोष भवर
शहर प्रतिनिधी अंबड
सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांनी अंबड नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यामार्फत जालना जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अंबड, पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करत गांभीर्यपूर्वक तक्रार अर्ज सादर केली आहे की, आंबेडकर नगर अंबड येथे सुरू असलेले प्युअर ब्लॉगचे काम बंद करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वरील विषयी सविस्तर माहिती अशी की, कसबे अंबड येथील आंबेडकर नगरमध्ये जाण्या येण्याचे रस्ता लगत अतिक्रमण झाल्यामुळे येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे तसेच कोणी आजारी पडले किंवा एखाद्या महिलेची प्रसूतीसाठी गाडी आणायची झाल्यास गल्लीत अतिक्रमणामुळे कोणतेच वाहन येत नाही त्यामुळे फार अडचण येत आहे तरी लोकांची अतिरिकमन झालेले तात्काळ काढून टाकण्यात यावे त्यानंतर सध्या चालू असलेले विहित गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉगचे काम तात्पुरते बंद करण्यात यावे. जोपर्यंत आंबेडकर नगर मधील अतिक्रमण काढून टाकीत नाही तोपर्यंत प्युअर ब्लॉकचे काम बंद करण्यात यावे. तसेच जोपर्यंत माझ्या तक्रारीची निवारण होत नाही तोपर्यंत वरील कामाचे बिल देण्यात येऊ नये अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदरील निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या तोंडाला काळी फासण्यात असा इशारा बाबासाहेब खरात यांनी दिला आहे.