शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
जिंतूर :दि.28 ऑक्टो. रोजी जिंतूर विधान सभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी (दि.28) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांसह अन्य हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूरातून सकाळी मोठी रॅली काढली. या रॅलीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्यासह गंगाधर बोर्डीकर व अन्य नेते वाहनावर विराजमान होते. मुख्य बाजारपेठेसह चौक व ठिकठिकाणीया रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सौ. मेघना साकोरे यांनी जिंतूर व सेलू या विधानसभा मतदारसंघाच्या विका साकरीता आपण कटि बध्द आहोत, अशी ग्वाही दिली. समाजा तील विविध वर्गांना न्याय मिळवून देण्याचं काम बोर्डीकर कुटूंबि यांनी सातत्याने केले आहे. या मतदारसंघात पायाभूत सोयी-सुवि धा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत विकासाचा आणि नागरीकांच्या उन्नतीचा अजेंडा आपण सातत्याने राबविला. आता पुढील पाच वर्षात या मतदार संघात निश्चितपणे गतीने परिवर्तन करु, अशी ग्वाही दिली.या वेळी माजी आमदार बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, सुरेश भुमरे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, संदीप हरिभाऊ काका लहाने,राधाजी शेळके, डॉ.पंडित दराडे, तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, अड. दत्तराव कदम, लक्ष्मण बुधवंत, वसंतराव शिंदे, दत्तराव महाराज सोनेकर, विजयकुमार वटाणे, विशाल देशमुख, शरद मस्के, रवींद्र डासाळ कर, दिनकर वाघ, डॉ. संजय रोडगे, सुंदर गाडेकर, राजेंद्र थिटे, सुरेश मामा खिस्ते, प्रमोद चव्हाण, आत्मा राम पवार, मुन्ना पारवे, श्याम पवार, गणेश काटकर,सुनील भोम्बे, गोपाळ रोकडे, प्रदीप चव्हाण, प्रदीप चौधरी, भगवान देशमुख,राम राव हुलगुंडे, सुधाकर कुकडे, सुनील घुगे, किशोर जाधव, दत्ता कटारे, भगवानराव वटाणे, एड. सुनील मते, भानुदास घुगे, सुधाकर जाधव, जगदीश घुगे, रामराव वराड, गजानन घुगे, रवी घुगे, विजय घुगे, गजानन वाकळे, एड. कुमार घनसावंत, भानुदास वाळके, प्रल्हाद महाराज घोगरे, सुमेध सूर्यवंशी, गजानन चव्हाण, कैलास खंदारे, रमेश ढवळे,सुंदरराव चव्हाण पांडुरंग आडे, विकास जाधव, पुनम राठोड, अशोक तमशेटे, उत्तम बुधवंत, फिरोज तांबोळी, विलास भंडारे, गणेश जाधव, संतोष जाधव, अशोक भाई, रहमान कुरे, संदीप चौधरी,शिवाजी काळे, हमीद खान पठाण, इंद्रजीत वाघी कर,भगवानराव देशमुख,संतोष तोषनीवाल गोविंद दायमा, नागेश तडकसे, पापा राठोड, संगीता घुगे, श्रीरंग भाई, मतीन लकडे, यशवंत घाटूळ, प्रदीप देशमुख, रमण कांगने, सचिन देवकर आदींची उपस्थिती होती.


