रामदास सानप
ग्रामीण प्रतिनिधी आष्टी
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश धस
यांनी आष्टी पाटोदा शिरूर कासार या विधानसभेसाठी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या मतदारसंघाची उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती परंतु काल गेवराई ची जागा अजितदादांना आणि आष्टीची जागा भाजपला असा तोडगा निघाला आणि आज सुरेश धस यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुरेश धस यांनी आष्टी शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन केले
व उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आष्टी बाजारतळ येथे मोठी सभा पार पडली.
आणि आष्टी शहर सुरेश धस यांच्या घोषणेने धगधगले