भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहूर – निसर्गाचा लहरीपणा अचानक होत असलेल्या धो धो पावसामुळे हाती आलेले पीक कधी वाया जाईल सांगता येत नाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे ढिगारे ताडपत्री हवेने ऊडुन गेल्याने थोडे फार ओले झाले असेल परंतु सोयाबीन चे भाव एवढे पाढले की शेतकऱ्यांचा लावलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. सोयाबीन बियाणे एवढे माहग की एक ब्याग पंचवीस ते तीस कीलोमध्ये ३००० ते ३२०० रुपये प्रर्यंत शेतकऱ्यांनी खरेदी केली आणि सध्या सोयाबीन प्रती क्विंटल दर ३२०० ते ४००० रुपये दराने खरेदी केली जाते आहे आणि सरासरी एकरी उत्पादन ७ क्विंटल होत असुन उत्पन्नाच्या तुलनेत सुरुवाती पासून खर्च धरता जेमतेम रुपये शिल्लक राहिले असल्याचे शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे आणि अशातच शेतकरी वर्गातून आवाज येत आहे आमचा वाली कोण पत्रकार मंडळी आपल्या प्रसिद्ध दैनिकातून आम्हा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडेल का की तेही दिवाळी विशेषांकाच्या जाहिरात मागणीच्या गरबडीत आम्हा शेतकऱ्यांना विसरु जाईल म्हणून पत्रकार माय बाप सोयाबीनच्या घटत्या दरापायी शेतकरी मेटाकुटीला आला आहे असे माहुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरच्या बांधावर आपल्या व्यथा व्यक्त केल्या.


