बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : विधानसभा 2024 निवडणूक उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीने दुपारी जाहीर केली. या यादीमध्ये हिंगोली विधानसभा भाजप वतीने विद्यमान आमदार तान्हाजी सखारामजी मुटकुळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. हिंगोली विधानसभेसाठी रामदास पाटील सुमठाणकर व डॉ. विठ्ठल रोडगे यांची नावे चर्चेत आली होती. रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली विधानसभेमध्ये निधी आणून ‘ हम भी कुछ कम नही ‘ याचा प्रत्यय आणून धुराळा उडवून दिला. तसेच संपूर्ण विधासभा पिंजून कार्यकर्त्यासह सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेमध्ये होतकरू हुषार माजी अधिकारी मिळाल्याने नवचैतन्य निर्माण झाले होत. डॉ विठ्ठल रोडगे यांनी रुग्ण सेवा करून जनतेची अडीअडणी सोडवण्याचा प्रयत्न केला व त्यांनी सुद्धा संपूर्ण विधानसभा पिंजून काढल्यामुळे तिकीटासाठी कोणाची वर्णी लागेल याकडे कार्यकर्त्यासह सर्वसामान्य जनतेमध्ये उत्सकता लागली होती. तिकीट मिळवण्यामध्ये अखेर विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी बाजी मारली असून त्यांच्या नावावर वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केले. तान्हाजी मुटकुळे यांना पुन्हा तिकीट दिल्याने रामदास पाटील सुमठाणकर व डॉ विठ्ठल रोडगे काय निर्णय घेतील याकडे विधानसभा मधील कार्यकर्त्यासह सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


