जय वारकरी ग्रामीण प्रतिनिधी पांढरकवडा
अमरावती विद्यापीठात १८ ते २० ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत झालेल्या अंतरविद्यापीठ मैदानी क्रीडा स्पर्धा २०२४-२५ घेण्यात आले होते, त्यात यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालय व महाजन सायन्स कॉलेज यवतमाळ चे विद्यार्थी निशांत सुभाष चव्हाण आणि प्रशांत सुभाष चव्हाण करंजी रोड या गावाचे रहिवासी असून या दोन्ही भावांनी गोळा फेक आणि डिस्कस थ्रो या खेळात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. गोळा फेक मध्ये महाजन सायन्स कॉलेजचे विद्यार्थी प्रशांत सुभाष चव्हाण ने १५.२० मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक पटकावला व अमोलकचंद महाविद्यालयचे विद्यार्थी निशांत सुभाष चव्हाण ने १५.०४ मीटर गोळा फेकून द्वितीय क्रमांक पटकावला व तृतीय क्रमांक अमरावतीच्या यश देशमुख ने १४.६० मीटर गोळा फेकला, व डिस्कस थ्रो मध्ये महाजन सायन्स कॉलेजचे विद्यार्थी प्रशांत सुभाष चव्हाण ने ३६.२० मीटर थ्रो करून द्वितीय क्रमांक पटकावला, या दोन्ही भावांचा हा सतत तिसऱ्यांदा विद्यापीठ मैदानी क्रीडा स्पर्धेत विजय आहे, यांनी २०२२-२३ पासून २०२४-२५ पर्यंत ही हॅटट्रिक झाली आहे.त्यांना अमोलकचंद महाविद्यालयचे क्रीडा शिक्षक किशोर तायडे व प्राचार्य मिश्रा सर, व महाजन कॉलेज चे प्राचार्य सदाशिवराव महाजन, क्रीडा मार्गदर्शक गजानन समृत्वार यांनी या यशा बद्दल कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, दोन्ही भावांना त्यांचे वडील सुभाष चव्हाण व कोच तुषार मुने व सिंग सर यांचे मार्गदर्शन लाभले.