सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित पोलीस मित्र करंडक२०२४ तालुका स्तरिय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे.१५ सप्टेंबर रोजी आयोजित “आई-वडील हेच आद्य दैवत ” या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत या शाळेची कु.आरती बालकिशन मोकळे ही सर्वतृतीय आली तर १० ऑक्टोबर रोजी आयोजित “व्यसनमुक्ती:- काळाची गरज “या विषयावरील निबंध स्पर्धेत कु.आरती मोकळे ही सर्वद्वितीय तर याच शाळेची महादेवी दत्ता मोरे ही सर्वतृतीय आली आहे. या यशाबद्दल सदर दोन्ही विद्यार्थींनीचे संस्था सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार, शाळेचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड, नागनाथ चेटलूरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे ,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, कर्मवीर सेवाभावी संंस्थेचे पदाधिकारी व परीक्षक डॉ. नरेश बोधनकर, प्रा.डॉ. माधव हळदेकर,दत्ता हमंद,करण समेटवार,व जयराज कंपाळे यांनी अभिनंदन केले आहे.


