संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ जिल्ह्यासह व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून आधीच कर्जबाजरी आलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या दलदलीत फसला जात आहेत.म्हणून शेतकऱ्यांना या नापिकीच्या काळात दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळावी.या करिता शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या समास्ये कडे वेधण्या करीता, शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण होईपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन राठोड यांनी जिवंत पणी सरणावर बसून आमरण उपोषणाला दिनांक १९/०९/२०२४ पासून कीन्ही येथे सुरवात केली.या पाच दिवसात निसर्ग देखिल शेतकऱ्यांवर कोपला प्रचंड ऊन ,पाणी वादळ,विजा असतांना सुध्दा हे आंदोलन सतत पाच दिवस चालू राहिले व पाचव्या दिवशी मात्र यात संघपाल कांबळे व गावातील शेतकरी यांनी उपोषणाला बसण्याची घोषणा केली गावातील शेतकरी यांच्यात शासना विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला ही बाब लक्षात घेता घाटंजीचे तहसीलदार यांनी वरिष्ठांना कळविले शेवटी सुहास गाडे आय. ए. एस.साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापुर,यांच्या हस्ते लेखी पत्र घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी विजय साळवे तहसीलदार घाटंजी पोलीस निरीक्षक सुरडकर व घाटंजी तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे,श्रावण नाईक, किसन राठोड, प्रेम महाराज, विठ्ठल राठोड, नामदेव जाधव, लावकुमार राठोड,देवा राठोड, उत्तम महाराज, उत्तम आडे,हलूसिंग तुरी, गुरुदेव जाधव, लखन जाधव, रामराव जाधव, कैलास राठोड, हेमंत जाधव,संजय राठोड,शेषराव जाधव,हरी महाराज,शिवलाल जाधव, विनोद जाधव, जयसिंगराव राठोड, अनिल राठोड, विलास राठोड, नरेंद्र राठोड, पतीबाई चव्हाण, सखुबाई राठोड, चंद्रकला राठोड, वलीबाई राठोड, राम राठोड,मनोज मुनेश्वर, रामराव राठोड, इंदल राठोड व कीन्ही गावातील संपुर्ण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


