संदेश पोहरकार शहर प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरात जगाला शांतिचा व मानवतेचा संदेश देनारे, इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवनुकीचे ( जुलूस) आयोजन करण्यात आले होते. सदर मिरवणुक ही जुलूस कमिटीचे अध्यक्ष शेख महमूद कुरैशी यांच्या मार्गदर्शना खाली जामा मस्जिद येथुन काढ़न्यात आली. सदर मिरवणुक ही शहरातील मुख्य मार्गाने अत्यंत शांततामय व शिस्तबद्ध रितीने निघाली. सदर मिरवणुक मध्ये विविध आकर्षक देखावे व मक्का मदीना येथिल काबा ची प्रतिकृति व हातात तिरंगा झेंडा घेतलेला युवक निसार खान पठान हा सर्वांचे लक्ष्य वेधुन घेत होता. सदर मिरवणुकिचे मानकर चौक येथे विकास पवार मित्र परिवार यांच्या वतीने जुलुस कमेटी चे अध्यक्ष व सदस्य यांचा शॉल व पुष्पहाराणे स्वागत करण्यात आले. सदर मिरवणुकीचे जामा मस्जिद येथे समापन झाले. सदर मिरवणुक मध्ये तेल्हारा शहरातील समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस स्टेशन तेल्हारा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सदर मिरवणुक यशस्वी करण्या करिता जुलुस कमेटी चे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.