करामत शाह तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला: कोतवाल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अकोला च्यावतिने मा. खासदार अनुप धोत्रे यांना निवेदन देण्यात आले.कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा व वेतन श्रेणी मिळण्यात यावे.महाराष्ट्रातील सर्व कोतवाल कोरोना काळात शासनाने दिलेल्या वेळोवेळी आदेशाचे पालन करत आहे.दिवस रात्र करुन कोरोना रुग्णांची सेवा केली आहे.स्थानिक पातळीवर सर्व माहीती व त्यांची काळजी घेत आहे. महसूल विभागमधील स्थानिक पातळीवर सर्व महसूल गोळा करणे,शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचणे.गौण खनिजास आळा बसविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना सहायक करणे निवडणूक आयोगाचे सर्व आदेशाचे कामे करणे.वरील मागण्याकरीता आपण शासन स्तरावर मान्य करुन सहकार्य करावे हिच विनंती असे निवेदन मा.खासदार अनुप धोत्रे, मा. आमदार रणधीर सावरकर, मा.आमदार नितीन देशमुख यांना देण्यात आले.निवेदन देतानी अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातुर,मुर्तिजापूर, बार्शीटाकळी,अकोला तालुक्यातील महिला व पुरुष सर्व कोतवाल उपस्थित होते.


