तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पालघर जिल्ह्यातील हरित वाढवण बंदराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑगस्ट रोजी भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तयारी पालघर जिल्हा मुख्यालयाजवळील कोळगाव येथील सिडको मैदानात सुरू करण्यात आली असून केंद्रीय बंदरे, नौकानयन जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आयोजित कार्यक्रमास्थानी भेट घेऊन सुरू असलेल्या तयारीची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. पालघर जिल्ह्यातील हरित बंदर वाढवण प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर बंदराच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे . पूर्व तयारीला प्रशासन कामाला लागले असून गुरूवारी कोळगाव येथील सिडको मैदानात सुरू असलेल्या तयारीची पाहणी करण्यात आली .यावेळी जेनपिएचे अध्यक्ष उन्मेष वाघ, जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना त्यांनी सुचना दिल्या आहेत. सोनोवाल यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळाची आणि हेलिपॅड स्थळाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी खासदार डाॅक्टर हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे भूमिपूजन समारंभ ३० ऑगस्ट रोजी होणार असून होणाऱ्या कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.