संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सुरू केलेली जन सन्मान यात्रा (शुक्रवार २३ ऑगस्ट) इंदापूर तालुक्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून, या यात्रेच्या माध्यमातून समजातील विविध घटकांशी अजित पवार हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ होणार आहे, यामध्ये शिरसोडी कुगाव या ऐतिहासिक उजनी बँक बॉटर वरील पूल, वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी संवर्धन व तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ होणार हाजी चांदशवली बाबा दर्गा सुशोभीकरण तसेच इंदापूर शहरातील रस्ते व भूमिगत गटर या कामांचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत. या भूमिपूजन समारंभा नंतर इंदापूर येथील जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती भव्य अशा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इंदापूर तालुक्यातील सर्व नागरिक, बंधू- भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.