मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :स्थानिक चांदूर रेल्वेमध्ये दलित वस्ती मधील असलेले मिलिंद नगर असो की गुरुकृपा कॉलनीमध्ये गार्डनची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. गार्डनने चक्क गजघाटाच स्वरूप ढोराचा कोंडवाडासारखं स्वरूप घेतले आहे. गार्डनमध्ये माणसं न जाता जनावरासाठी बांधले गेले की काय, गेल्या किती दिवसापासून गुरुकृपा गार्डनची वारंवार नगरपरिषद ला निवेदन देऊनही त्याची दुरुस्त जशी ती तशी आहे चार भिंती बांधून जेल खाना तयार करून नगरपरिषद तर्फे देण्यात आलेल्या प्रतिष्ठित नागरिक महिला यांना फिरण्याकरिता गार्डन दिले होते लहान मुलांना खेळण्यासाठी व व्यायाम करण्याकरिता काही साहित्य सुद्धा लावण्यात आली परंतु झालं झुडप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की त्या गार्डनमध्ये जाता कोणाला येत नाही . गार्डनमध्ये साप ,विंचू इतरही सरपटणारे प्राणी गेला काही दिवसात मोठ्या प्रमाणात आढलून आले आहे. भिंती मुळे सर्व नागरिकांना महिलांना अमरावती रोड फिरायला जावे लागत आहे ,तेथे वाहत्या वाहनाचा वेग सांभाळून रोडवर फिरावे लागते कॉलनीला लागून जे गार्डन बांधलं ते नेमकं कशासाठी बांधलं याची माहिती अजूनही तिथले रहिवासीना कळले नाही त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद चे असून लोकांनी वारंवार निवेदन देऊन त्यांना माहिती देऊन कर्मचाऱ्यांशी संपर्क करून गार्डनची दुरुस्ती झाली नाही .नगर परिषद पूर्ण पणे बेजबाबदारीपणा हेकेकोरपनानी दिसून येत आहे . प्रतिष्ठित नागरिक व वय वृद्ध महिला पुरुष हे आपल्या नातवंडांना गार्डनमध्ये खेळण्यासाठी व आपला टाईम घालवण्याकरिता, फिरण्याकरिता व्यायाम करण्याकरिता, जाण्यासाठी कॉलनीला लागून गार्डन व्यवस्था असते परंतु गार्डनची दुरुस्त नसल्यामुळे रस्त्यांनी महिला पुरुष फिरण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी जावं लागत आहे. कुठलेही अपघात झाल्यास नगर परिषद जबादर राहिल असे गुरुकृपा कॉलनीमध्ये रहिवाशयाचा आरोप आहे . पूर्ण आढावा सुमेद सरदार यांनी घेतला नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या संपर्क साधला परंतु अजून पर्यंत नगरपरिषदेचे कुठल्याही कर्मचारी कामगार आले नाही.











