प्रशांत सूर्यवंशी तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोद्यातील आमराई शिवारात श्री.राजेश तुकाराम सुर्यवंशी ह्यांचा शेतात आमराई(धानका वाडा) दिनांक ३० जुलै वार मंगळवारच्या मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास बिबट्यानी झोपडीत बांधलेल्या बकऱ्यावरती हल्ला केला.बिबट्याच्या हल्ल्यात तीन बकऱ्या आल्या.त्यापैकी बिबट्या एका बकरीला सोबत घेऊन गेलाय आणि एक बकरी शेतातील ऊसात मृत अवस्थेत सोडून गेला.एका बकऱ्याची बांधलेली दोरी सुटली नाही म्हणून त्याला जागेवरच जखमी करून गेला.रात्री ४च्या सुमारास शेतातील जागल्या जागी झाला तेव्हा त्यांनी पुन्हा बिबट्याला झोपडी कडे येताना पाहिले.जागल्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.सदर घटनेची वनविभागात फिर्याद नोंद केली असून वनभिगातील अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तरी वनविभागाने ह्या घटनेला गांभीर्याने घ्यावे व बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसवावा ही मागणी स्थानिक शेतकरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.शेताच्या अवती भवती भरपूर बकऱ्या आहेत आणि रहिवास परिसर देखील आहे त्यामुळे नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.