मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/किल्ले धारूर दि:०६ जुलै २०२४ खामगाव – पंढरपूर दिंडी महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या अपघातात वारकरी जागीच ठार घटना शुक्रवारी दि.०५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी तेलगाव सुंदरनगर साखर कारखान्यासमोर घडली आहे. सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी परंपरेनुसार याही वर्षी दिंडी पंढरपूरकडे चालली होती. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. दिंडी ही दि.०३ जुलै २०२४ बुधवार रोजी लाडनांद्रा येथून निघाली. दिंडी दि.०५ जुलै २०२४ रोजी तेलगाव ता. धारूर येथील सुंदरनगर साखर कारखाना येथे माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती. दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोरील रस्ता ओलांडताना धारूरच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजतात दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश सोळुंके, बालाजी सुरेवाड आदी घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी प्रेत सेवाविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे तेलगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.