देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटा-१ शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले,या शाळेतील कार्तिक सुरेश पुंगळे,सृष्टी विक्रम वनार्से,अर्चना ज्ञानेश्वर वनार्से,नंदनी संतोष वनार्से,अंकिता भानुदास पुंगळे व ज्ञानेश्वरी मिठ्ठू वनार्से या सहा विद्यार्थ्यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्री शहागडकर डी.एस,केंद्रप्रमुख,श्री जीवरग डी डी सर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रघुनाथ वनार्से,उपाध्यक्ष श्री आप्पासाहेब वनार्से,समितीचे सर्व सदस्य,पालक तसेच गावाचे सरपंच श्री राजु वनार्से,शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश एस ढाकणे,सहशिक्षिका श्रीमती निकम एस बी,सहशिक्षक श्री राजगुरू एस एस,श्री सावंत डी डी व श्री कासले डी.सी. यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच पालक वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.











