अधिकारी वाळू माफियांचे मलई खाऊन लाचखोरीपुढे झुकत आहेत
अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
गौणखनिज विभागाच्या संगनमताने माफिया वर्षांपासून खनिज संपत्तीचे चोरी करत आहेत. महसूल विभाग आणि पोलीस प्रसाशन आश्रयाने फोफावलेल्या वाळू माफियांचे मनोधैर्य बळकट होऊन शासनाची महसुलाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असून विभागीय प्रतिनिधी कुंभकरणाच्या निद्रेत तल्लीन असताना काही अधिकारी वाळू माफियांचे मलई खाऊन लाचखोरीपुढे झुकत आहेत. वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाईच्या नावाखाली लहान मासे पकडून केवळ अन्नपुरवठा केला जातो. आणि बड्या व्हाईट कॉलर माफियांवर कारवाई करण्यासाठी विभागाचे दुर्लक्ष होते.वाळू तस्करांकडून नियम डावलून वाळूचे उत्खनन केले जात आहे. नदी घाटातून नियमाविरुद्ध रात्रभर वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असते,वाळू तस्कर एवढे निडर झाले की ते पोलीस चौकी समोर बांधकाम ठिकाणी रात्रीला रेती आणून ढीग लावत आहे.ना मंडळ अधिकारी ना पोलीस ठाणेदार, यांना रॉयल्टी मागत नसल्याने शासनाचा या तस्करांकडून महसूल बुडत आहे . असे असतानाही वाळू तस्करीचे अवैध धंदे सुरू असून गौणखनिज विभागही वाळू तस्करांच्या वर्चस्वापुढे नमते घेत आहे. शेवटी त्यांना कोणाच्या प्रभावाखाली पाठबळ दिले जात आहे? दिवसभर ट्रॅक्टरच्या ये-जा सुरू असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. मात्र वाळू तस्करांकडून बेधडकपणे वाळू उत्खनन केले जात आहे, याकडे संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनाही आजपर्यंत लक्ष दिलेले नाही, तसेच नदीतील वाळूची चोरीहोत असताना . हा जबाबदार विभाग या तस्करांना भेटून पैसे कमवण्यात व्यस्त आहे.