छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव
विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त सिल्लोड शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये 35 फुटी झेंड्याचे ध्वजारोहण करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला,सिल्लोड. सोयगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री ठगणराव देवराव भागवत पाटील यांच्या हस्ते उभारण्यात आली, यावेळेस मा. उपसभापती अरुण पाटील काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे शहराध्यक्ष अक्षय पाटील, सिल्लोड तालुका प्रतिनिधी विलास गोराडे पाटील, अनिल काळे, गणेश सोनवणे, विलास काळे, समाधान पाटील, रामेश्वर जाधव, अक्षय इंगळे, समाधान खरात, गणेश खरात, राजू बकरे, कृष्णा महाराज कांबळे, बापू शेख, शुभम वाघमारे, शुभम मिटकरी, देविदास ढोरमारे, ऋषिकेश ताटे, दादाराव पवार, मनोज साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते दरम्यान सिल्लोड व सोयगाव शहरासह दोन्ही तालुक्यातील मागील 15 वर्षापासून श्री ठगणराव भागवत पाटील मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव, क्रीडा व संस्कृतिक कार्यक्रम भाषण निबंध स्पर्धा व्याख्यान अन्नदान गोरगरिबांना विविध प्रकारची मदत तसेच सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी आचारसंहिता असल्याने सामाजिक कार्यक्रम नंतर होणार असल्याची माहिती श्री ठगणराव भागवत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.