दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 11: पोलिसांच्या हाताला झटका देऊन गाडीतून उडी मारून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 07 मे 2024 रोजी हा आरोपी पसार झाला होता. म्हसावद पोलीस ठाणे गु. र. नं. 129/24 कलम 420, 504, 506, 34 भा.दं.वि. मधील अटक आरोपी जालसिंग प्रेमदास मोरे रा. नांदे ता. शहादा जि. नंदुरबार यास दि. 07 मे 24 रोजी अटक करून शहादा न्यायालयात पोलीस कोस्टडी रिमांड मंजूर करून घेण्यात आलेला होता. शहादा पोलीस ठाणे लॉकअपमध्ये आरोपींना जमा करण्यासाठी घेवून जात असताना त्यातील एका आरोपीने पोलिसाच्या हाताला झटका देऊन गाडीतून उडी मारून पळून गेला होता. सदर बाबत शहादा पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 321/24 कलम 224 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद झाला. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने आणि तसेच अप्पर पो. अधिक्षक निलेश तांबे व एसडीपीओ दत्ता पवार, पोनि किरण खेडकर, पोनि शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, शहादाचे डी.बी. पथक, म्हसावदचे प्रभारी राजन मोरे व पथक आणि पीएसआय. जितेंद्र पाटील व पथक असे पथक तयार करण्यात आले होते. तपासा दरम्यान सरपंच, पोलीस पाटील, अटकेतून पळालेल्या आरोपीचे जवळचे नातेवाईक यांच्याशी संपर्क करून आरोपी बाबत गोपनीय माहिती प्राप्त करून त्यास २४ तासाच्या आत अथक परिश्रम घेऊन दि.08 मे 24 रोजी सायंकाळी 07.30 वाजता अटक करण्यात आली.