दिनेश झाडे चीफ ब्युरो विदर्भ
कोरपना:-कोरपणा तालुक्यातील कुसळ या ठिकाणी हजरतअब्दुल रहमान दुल्हाशाह बाबा यांचा वार्षिक उत्सवविविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात तीन दिवस कार्यक्रम पार पडला यावेळी कौमी एकता समारोहकार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट संजय धोटे यांनी भारताची संस्कृती सुफी संतांमुळेमानवता धर्माचे पालेमुळे खोलवर रुजले यामुळे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत असल्याचे चित्र आहे हजरत दुल्हाशहा बाबा यांचा पुरातन काळातील मजार नाल्याच्या काठावर निसर्ग रम्य व सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी आहे येथे मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊनपूजा अर्चना करतात येथे विशेषता कुसळ हे गावआदिवासी लोकवस्तीचे असून या भागातील अनेक समाजाची श्रद्धा या ठिकाणी आहे या भागातील सर्व जाती धर्म एकतेचे प्रतिक म्हणून या ठिकाणाची ओळख आहे समाजामध्ये तेढ निर्माण होत असला तरी सुफी संतांनी आम्हाला व थोर महात्म्यांनीमानवता हेच खरे तत्त्वज्ञान मनामध्ये रुजवून आपण समाजाचे कार्य करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी दिसून आली मात्र पोलीस यंत्रणेच्या कडे कोट बंदोबस्तामुळे या ठिकाणी तंबाखूमुक्त व विवाद मुक्त असा सोहळा पार पडला तसेच यात्रेमध्ये कोणत्याही अवैध्य व्यवसाय सुरू केला नाही यामुळे कोरपणा येथील ठाणेदार एकाडे व त्यांच्या सर्व स्थापने तंबाखूमुक्त खर्रा मुक्त यात्रा करून एक नवीन पायंडा त्या ठिकाणी घातला आहे यावेळी प्रशासनाकडून ॲम्बुलन्स अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, हजरत दूल्हेशहा बाबायांचा वार्षिक उर्फ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कमिटीचे अध्यक्ष आबिद अलीयांनी बाबाच्या पुरातनगावाचा इतिहास सांगितलापार पडलेल्या कार्यक्रमात जि प माजी सदस्य अविनाश जाधव निलेश ताजने रमजान अली सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कमिटी बाबाराव सिडाम शहेबाजअली वैभवकिनाके कपिल आत्राम शुभम पंधरे रमेश ठाकरे नादिर कादरी मोहब्बत खान पठाण इसराइल शेख गुलाबअजय पोराते यांचे सह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.