प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
हातकणंगले ता. १४ : मोदींच्या प्रचारासाठी करोडो रुपयाच्या जाहिराती दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात मोदींची फसवणुकीचीच फक्त ग्यारंटी आहे. त्यामुळे देशभरा- तील लाखो कामगार व त्यांचे कुटुंबीय भाजपला मतदान करणार नाहीत.९ हजार पेन्शन, ४ कामगार कायदे रद्द करा,इएसआय व भविष्य निर्वाहनिधी मर्यादा उठवा अशा मागण्या सभेत केल्या. हे जर मान्य करणार नसेल तर कोल्हापूर सांगली येथील कामगार बंधू भाजपला मतदान करणार नाहीत या निर्णयाची अंमलबजावणी करतील अशा प्रकारचा ठरावच औद्योगिक कामगार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.शिरोली श्रमिक कार्यालय येथे झालेल्या सभेत अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, “मोदी सरकार हे खोटारडेपणा करणारे सरकार आहे. १० वर्षात २० कोटी रोजगार केले असते, तर आज सर्वांना काम असते. पण आश्वासन देणाऱ्या मोदींनी देशातल्या युवकांची देखील फसवणूक केली.मुंबई गिरणी कामगारांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली त्यांना हद्दपार करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुंबईच्या जमिनीची बिल्डर लोकाना १० टक्के दराने खिरापत वाटण्याची त्यांनी व शिंदे यांनी २०१९ सालात निवडणुकी- च्या तोंडावर भूमिका घेतली.”यासभेस शिरोली , कागल, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहत, तर सांगली येथील आष्टा व कुपवाड येथील कामगार बंधू उपस्थित होते.


