सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: नांदगाव तालुक्यातील भालूर येथे आज आमदार सुहास कांदे यांचे प्रयत्नातून या गावात चार कोटी रुपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी गटनेते राजेंद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकाडे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, आदि उपस्थित होते. यापूर्वी आमदार सुहास कांदे यांचे प्रयत्नातून ११ कोटी रुपयांचे कामाचे लोकार्पन करण्यात आले होते. आज रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 32 लाख रुपये, सभा मंडप कामासाठी १० लाख रुपये, अंगणवाडी संरक्षण भिंत ९ लाख रुपये, बंधाऱ्यातून गाळ काढण्यासाठी ६ लाख रुपये, तसेच शाकंबरी नदीवर ३ कोटी ५५लाख रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर झाले आहेत. या कामामुळे गावातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बाब असल्याचे सरपंच शालुताई थेटे यांनी सांगितले. गावात भरीव असे विकासाचे अनेक कामे दिल्याने त्यांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले. यावेळी गावातील सरपंच शालुताई थेटे, माजी सरपंच अर्चना निकम, दिगंबर निकम, देविदास निकम,उपसरपंच रमेश निकम, ग्रामपंचायत सदस्य नंदू इले, गणपत निकम, राजेंद्र मेंगाळ, विठ्ठल सोमासे, सिंधुताई निकम, भागवत पवार, रामभाऊ मडके, विठ्ठल आहेर, कौतिक थेटे, राजेश शिंदे, कैलास घोरपडे, वसंत निकम, राजेश शिंदे, वसंत निकम, बबन मेंगाळ, पत्रकार राजेंद्र तळेकर, देविदास खामकर, भाऊराव शिंदे, ग्रामसेवक युवराज निकम, आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सोमनाथ तळेकर यांनी केले.


