अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून विभक्त झालेला असा हा आमचा पालघर जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये बहुतेक आदिवासी वस्ती आणि आदिवासी गावे असल्याचे दिसून येतात, ठाणे जिल्ह्यातून विभक्त झालेला पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी विभक्त झाला असून सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये आजही शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाची गरज असल्याची दिसून येते,कारण आजही पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गावाखेड्यांमध्ये, अशिक्षिततेचे प्रमाण जास्त दिसून येते, आजही या जिल्ह्यामध्ये तरुण मंडळी शिक्षणाला कमी महत्व देताना दिसून येतात,तसेच पालघर जिल्ह्यातील बहुतेक तरुण हे व्यसनी झाल्याचे दिसून येतात, हे सर्व बघता पालघर जिल्ह्यामध्ये अजूनही शिक्षणाचा प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर समाज म्हणून एकत्र आणणे आणि सामाजिक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांना समाज प्रबोधन करणे,सामाजिक गोष्टीतून त्यांना एकत्र येऊन समाज पुढे कसा नेता येईल यासाठी त्यांना प्रबोधन करणे गरज आहे,आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी समाज प्रर्बोधनाचे कार्यकर्म घेणे, समाज प्रबोधनाच्या गाण्यांच्या माध्यमातून समाजात जागृती करणे,आपण समाज म्हणून एकत्र येऊन सर्व मिळून पुढे कसे जाऊ शकतो याचे मार्गदर्शन करणे, गरिबी, अशिक्षित पणा, बेरोजगारी, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, आदिवासी संस्कृती, आदिवासी देव आणि धर्म, असा वेगवेगळ्या विषयांवरती आजही शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन करून लोकांना एकत्र आणण्याची काळाची गरज आहे,
वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आदिवासी आदिवासींमध्ये भांडण लावून देऊन आदिवासींचे योजनांचा आणि आदिवासींचा लाभ कोणीतरी तिसराच घेताना दिसून येतो यासाठी आदिवासी समाजातील सर्व तरुणांना त्यांचे हक्क अधिकार कोण कोणते आहेत याची माहिती देऊन त्यांना नेहमीच जागृत करून स्वतःच्या हक्कासाठी लढायला तयार करणे सध्या गरजेचे आहे. असं नाही की पालघर जिल्ह्यातील सर्वच तरुण व्यसनाच्या आहारी आहेत मात्र ठराविक तरुण हे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तर ठराविक तरुण हे शिक्षकाला महत्वच देताना दिसून येत नाही तर ठराविक तरुणांना त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत हेच माहिती नसल्याकारणामुळे त्यांच्या हक्कासाठी लढायला ते घाबरताना दिसून येत आहे, म्हणून असा सर्व तरुणांना समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून जागृत करून आदिवासी पालघर जिल्हा समृद्ध करणे आणि प्रगतीपथावर नेणे हे आपल्याच हातात आहे असं समजून जेव्हा प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने काम करायला सुरुवात केली तर नक्की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक नवा परिवर्तन होताना दिसून येईल आणि या परिवर्तनामुळे आपला पालघर जिल्हा एका नवीन विकासाच्या दिशेने जाताना दिसून येईल, म्हणूनच म्हणतो पालघर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाची गरज असल्याचे दिसून येते.