मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी: मौ.मांजरम तालुका नायगांव( खै) येथे गडगा ते मांजरम रोडवर पेट्रोल पंपाच्या बाजूला मुस्लिम समाजाचे जिल्हास्तरीय दोन दिवसीय “उमुमी तबलीगी इजतेमा” चे दिनांक 24, व 25 नोहेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी असंख्य नागरीकांच्या आसन व्यवस्था,व नमाज पठण करण्यासाठी, येणाऱ्या तमाम मुस्लिम बांधवांची उपस्थिती संख्या लक्षात घेऊन मैदानाच्या कामांची जय्यत तयारी सुरू असून .यासाठी भव्य इजतेमा मंडप रस्ता, वीज, जेवणाचे चार झोन, पाण्याचे झोन, नमाज पठन साठी जागा, वजू खाने, वाहान पार्किंग, शौचालया सह इतर विविध कामासाठी मागिल 15 दिवसापासुन मुस्लिम समाज बाधवांनी दिवस रात्र काम युद्धपातळीवर चालु आहे या इजतेमा साठी नांदेड जिल्हा व ग्रामीण भागातील मुस्लिम समाजतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत दोन दिवसीय ” तबलीगी इजतेमा” साठी नांदेड व, पुणे येथील मुस्लिम मौलाना (धर्मगुरू) “पवित्र कुराण” व प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांच्या संगीतलेला उपदेश यावर प्रवचन कारणार आहेत तरी सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अव्हान मांजरम येथिल मुस्लिम समाज बांधवांनी केले आहे.