अमरावती : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अजाअजप्रका कायद्यातंर्गत ऑगस्ट महिन्यात झालेल्या गुन्ह्यासंबंधात आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात शहरी विभागात एकूण 3 तर ग्रामीण भागात 4 अशा एकूण 7 गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पोलीस तपासावर असलेले गुन्हे, हायकोर्ट स्थगिती गुन्हे, अपिल प्रलंबित गुन्हे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित गुन्हे याबाबत आढावा घेण्यात आला. अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणात निधी प्राप्त होताच, तात्काळ अर्थसहाय वाटप करण्यासाठी निर्देश देण्यात आले. बैठकीमध्ये पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, उप पोलिस अधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, शासकीय अभियोक्ता ॲड. गजानन खिल्लारे, अशासकीय सदस्य दिलीप काळबांडे, राजेद्रं महल्ले, समाज कल्याण निरीक्षक एस.आर.कोंडे आदी उपस्थित होते.