जळगाव : राज्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बलात्कार, सामूहिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यात जळगावात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात एमआयडीसी परिसरातील दोन लॉजवर पोलिसांनी छापा छापा टाकला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 मुला मुलींना पकडण्यात आले. काय आहे संपूर्ण प्रकरण – पोलिसांनी एमआयडीसीतील दोन लॉजवर गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत 12 मुलामुलींना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी लॉजमालक आणि दलालांनाही अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या पथकाने छापा टाकला. तसेच यावेळी एका ठिकाणी 4 मुली व 4 मुले तर दुसऱ्या ठिकाणी 8 मुली व 8 मुलं मिळून आली. यातील काही मुली परप्रांतीय तर काही मुली या विविध महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. यातील परप्रांतीय मुली या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत. मर्जीने आल्या, मुलींनी दिली ही धक्कादायक माहिती – दरम्यान, पोलीस तपासात याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्या होत्या. तसेच आपण आपल्या मर्जीने आल्या होत्या, असे या मुलींनी सांगितले आहे. याप्रकणी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.