अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक , आयक्यूएसी समन्वयक व निसर्ग कट्ट्याचे सदस्य डॉ. मिलिंद विष्णुपंत शिरभाते यांना नुकताच अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार 2020 जाहीर झालेला आहे सदर पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम दहा हजार रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येणार आहे. सदर निर्णय हा विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल च्या सभेमध्ये घेण्यात आला पुरस्कारासाठी विद्यापीठाने पाच सदस्य गठीत असलेली ऑक्टोबर महिन्यात डॉ शिरभाते यांनी केलेल्या कार्यासंबंधी माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यापीठाने ठरविलेल्या निकषांवर त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या उपक्रमा मध्ये जसे की पर्यावरण संबंधी केलेल्या विशेष कार्यासंबंधी ची माहिती, शासकीय / सामूहिक अथवा खाजगी जमिनीवर विविध प्रकारच्या झाडांची लागवड, पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात ग्रामीण भागात लोकसहभागातून केलेले उल्लेखनीय कार्य, वृक्षलागवडीचे श्रमदानातून केलेले कार्य, रोपवाटिके द्वारे रोपांची निर्मिती, रोपांचे संरक्षण संवर्धन व वितरण यासंबंधीची माहिती, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे व त्यांच्या वापरासाठी प्रवृत्त करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती, वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन जलव्यवस्थापन जलसंवर्धन व जैवविविधता संरक्षण संवर्धन व व्यवस्थापन अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर या संबंधात प्रत्यक्ष केलेल्या कार्याची माहिती व जनजागृती/ प्रसिद्धी व प्रेरणा याबाबत तपशीलवार माहिती, लागवड केलेल्या जिवंत झाडांचा तपशील, पर्यावरण जनजागृती यासंदर्भात आयोजित केलेली व्याख्याने/ प्रकाशने / प्रसिद्धी / चित्रफिती इत्यादी बाबींची माहिती , यापूर्वी पर्यावरणासंबंधी केलेल्या विविध कार्याकरिता काही पारितोषिक पुरस्कार प्रशस्तीपत्र इत्यादी मिळाली असल्यास त्यांचा तपशील व इतर आवश्यक माहिती तपासून घेतली व येत्या 1 मे 2021 रोजी आभासी पद्धतीने होणाऱ्या समारंभात तो प्रदान करण्यात येईल असे पत्राद्वारे कळविले आहे. डॉ शिरभाते यांनी सदर पुरस्काराचे श्रेय हे त्यांच्या पत्नी डॉ अमृता शिरभाते आई वडील, निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल सावंत व सर्व कट्ट्याचे सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जगदिश साबू व सर्व कर्मचारी वृंद तसेच अकोला वन्यजीव विभाग अकोला येथील विभागीय वन अधिकारी श्री मनोज कुमार खैरनार , सहाय्यक उपवन संरक्षक, श्री. साबळे व काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री . भानुदास पवार, वनपाल श्री. चाऊस, वनरक्षक कु . शिल्पा घुकसे, कु. अल्का मंजुळकर, गाईड दत्ता शेलकर, विकास आकोडे व अकोला सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारीश्री. विजय माने, अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी कु. नम्रता ताले यांचे आभार व्यक्त केले.
डॉ.शिरभाते याना 2019 साली विद्यापीठाने उत्कृष्ठ सेवा गौरव पुरस्काराने सुद्दा सन्मानित केलेले आहे हे विशेष. भारतीय शिक्षण मंडळ नागपूर येथील सर्व सदस्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना असलेली पर्यावरण याविषयीची आवड प्रेम व लोक जोडून ठेवण्याची वृत्ती यामुळेच काटेपूर्णा अभयारण्य आज लोकांपर्यंत पोहोचलेले आहे महाविद्यालयातील व शालेय विद्यार्थ्यांची वेळोवेळी सहल आयोजित करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यशाळेचे आयोजन करणे किंवा फॉरेस्ट गाईड चे ट्रेनिंग घेणे जेणेकरून संरक्षित क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या गावांमधील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता सतत मार्गदर्शन करत राहणे, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करणे इ. त्याच्या या कामगिरी बद्दल सर्वच अकोला वासीयांना हर्ष व आनंद होतो आहे.