दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा : जिल्हा परिषद शाळा आष्टे येथे शिक्षण परिषद शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव, केंद्रप्रमुख युवराज मराठे, पदोन्नती मुख्याध्यापक कैलास लोहार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिदास पवार, ज्येष्ठ पत्रकार गुलाबसिंग गिरासे, पदोन्नती मुख्याध्यापक राजेंद्र देवरे व जयप्रकाश वाघ , फुंदीलाल माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमांमध्ये एफ. एल.एन.अध्ययन स्तर उपक्रम फलनिष्पत्ती, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध उपक्रम आढावा व अंमलबजावणी,दिक्षा ॲप प्रोफाइल अद्यावत करणे व गणित विषय शैक्षणिक साहित्याच्या परिणामकारक वापर व गणित विषय पाठ सादरीकरण या विविध विषयांवर चर्चात्मक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले या विषयांचे सुदाम गोसावी ,धोंडू ठाकूर, मनीषा साठे, किशोर पाटील, संजय लोहार व दिलीप वळवी यांनी सादरीकरण केले. शिक्षण परिषदेमध्ये आष्टे, मोड,मोहिदा, खरवड , पुनर्वसन ७, कढेल, गुंजाळी, खेडले तऱ्हावद, कळमसरे माध्यमिक मोड, माध्यमिक त-हावद या शाळेतील राजू सामुद्रे, दिलीप वळवी ,शितल शिंदे, कैलास सामुद्रे, राजेंद्र जाधव,सिमा पाटील, लता पटले, अर्जुन पराडके, रंजना पवार,सायसिंग पाडवी, दिलीप पाटील, तेजस्विनी देसले, सुरुपसिंग वळवी, सतीश सूर्यवंशी,रवींद्र माळी, योगेश ढोले ,रक्षा चौधरी यांनी सहभाग नोंदवला. आभार राजू सामुद्रे यांनी मानले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास लोहार, राजू सामुद्रे , राजेंद्र सूर्यवंशी व दिलीप वळवी यांनी परिश्रम घेतले.