संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार (धडगाव ) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील मांडवी ते गोरांबा रस्ताची दुरावस्था झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,यांच्या नावाने तयार होणाऱ्या रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जाते. असे स्थानिक नागरिकांकाडून मिळालेल्या माहिती नुसार आहे.गावाकडे बसची सेवा नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व तसेच नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करा लागतो. सदर रस्ता अतिदुर्गम भागातील आहे त्यामुळे डोंगरदऱ्यातील हा रस्ता चढउतार असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते. वर्षानुवर्षे खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण तर चालु असते. रस्त्यावरील डांबरीकरण अद्यापही झालेले नाही. रस्ता खराब असल्याने एखांदा आजारी माणूस असेल किंवा एखांदी महिलेची डिलेव्हरीची वेळ आली असेल अशा नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी वेळेवर गाड्या मिळत नाही. आणि चुकुन जर गाडी मिळालीच एखांदी तर खराब रस्त्यामुळे दाखवण्यात जाण्या आधीच गर्भवती महिलेची रस्त्यातच डिलेव्हरी होऊन जाते अशावेळी महिला महिला दगवण्याची शक्यता असते. मांडवी ते गोरांबा रस्त्याचे डांबरीकरण 2008 साली करण्यात आले होते. मागील 14 वर्षपासून या रस्त्याला कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा नवीन रस्ता करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सदर रस्त्याच्या दुरुस्ती कडे पूर्णतह दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. दुर्गम भागाच्या निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष देत नाही. मांडवी ते गोरांबा रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थानी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.











