शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील महिला मुक्ती मोर्चा चे सर्व पदाधिकारी भंडारा येथे जाऊन पल्लवीला न्याय मिळावा याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी अकोट तालुक्यातील तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख गणेश वाकोडे अकोला जिल्हा संघटक गणेश बोंडे अकोट संघटक गजानन धांडे अकोट तालुका उपाध्यक्ष वंदना इंगळे अकोट तालुका सहसचिव पुष्पा तीहिले विठ्ठल यओकार व तसेच अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजकुमार वानखेडे याची निवड करण्यात आली. यावेळी अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सामील होऊन नागपूर महिला मुक्ती मोर्चा चे महिला जिल्हा अध्यक्ष दुर्गाताई वाठ यांची मुलगी पल्लवी लांजेवार या मुलींची भंडारा येथील पती,व घरातील नातेवाईक नी प्रथम पल्लवीला फाशी देऊन घरातील पंख्खाला लटकविण्यात आले.पल्लवीला न्याय मिळावा व आरोपींवर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी महिला मुक्ती मोर्चा चे वतीने दि.30 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले व 302 नुसार गुन्हा दाखल केला नाही तर मुंबई येथील आझाद मैदानावर मोर्चा काढला जाईल व महिला वरील अन्याय अत्याचार कधीच खपवुन घेतल्या जाणार नाही असे महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोक खरात बोलताना ठणकून सांगितले. या वेळी भंडारा येथील आमदार भोंडेकर याचे साह्यक सचिव आशिष चवडे यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.यावेळी महिला मुक्ती मोर्चा चे दर्शिष चौदे,महमुद खान, डॉ.भजनकर, विलास साखोरे, कमलेश कामडी.राजेश्वरी लाजेवार, जयश्री चातुरकर,पुष्पा साखरे,किशोर गेडाम,दिपक गंगवाणी,मिनलताई धोटे,पंकज डोणारकर, दुर्जनसिंह बावरी सह असंख्य महिला मुक्ती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पल्लवी ला न्याय न मिळाल्यास महिला मुक्ती मोर्चा चे वतीने प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला व सर्व पदाधिकाऱ्यांनी पल्लवीला श्रद्धांजली वाहिली.