बुलडाणा, दि. 1 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय अकोलांतर्गत कामगार कल्याण केंद्र, बुलडाणा यांच्या वतीने चोपडा मोटर्स, बुलडाणा येथे दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी प्रशासकीय गतिमानता अभियानातंर्गत आर्थिक बचतीबाबत मार्गदर्शन शिबीराचे अयोजन करण्यात आले . या शिबीराच्या अध्यक्षस्थानी चोपडा मोटर्सचे घनश्याम चोपडा होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित चोपडा, श्रूती भडेच उपस्थित होत्या. या शिबिरात आर्थिक बचती बाबत चार्टड अकाऊंटंट श्रीमती अंकिता गौरव भडेच, व्यवस्थापक दिपक चंदन यांनी आर्थिक बचत करून कुटूंबियांच्या गरता भागविताना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्यादृष्टीने कशी बचत करावी या विषयावर व आर्थिक बचतीचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. चोपडा यांनी कामगारांनी आपल्या कुटूंबियांच्या गरजा लक्षात घेवून खर्चाचे प्रमाण निश्चित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला कामगार कल्याण केंद्राचे संचालक नंदकिशोर खत्री उपस्थित होते. संचलन सौ विद्या शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन निलेश प्र. देशमुख यांनी केले.











