पेरमिलीत 400 नागरिकांनी घेतले मोफत उपचार.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- गडचिरोली जिल्हातील नागरिकाकरिता वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुर्गम भागात दहा दिवसीय आरोग्याचा महायज्ञ या शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.त्याप्रमाणे अहेरी तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेले पेरमिली या ठिकाणी दि.4 जानेवारी ला अचानक पणे महा आरोग्य शिबीराची टिम दाखल झाली.टिम दाखल झाल्याची भनक सुद्धा येथील नागरिकांना नव्हती.माञ अहेरी तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख सुभाष घुटे यांनी त्वरित पेरमिलीत धाव घेतली.त्यांनी स्वत:एका गाडीला माईक स्पिकर लावुन कार्यकर्तेला सोबत घेऊन पेरमिली गावातील प्रत्येक गल्लोगलीत फिरून नागरिकांना आरोग्य मोफत तपासणी टिम आल्याची माहीती दिली.त्यांनी नागरिकांना वेळेवर माहीती दिल्याने पेरमिली येथील 400 नागरिकांना मोफत उपचार मिळाले.या शिबीरात अनेक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तसेच कोविड टेस्ट, हृदयविकार (ई सी जी) किडणीस्टोन, कॅन्सर, नाक – कान – घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी,जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.यावेळी आरोग्य टिम मध्ये मंगेश चिवटे कक्षप्रमुख शिवसेना मुंबई,गजानन नारलाभार वैद्यकिय सहायक मुंबई,गणपती कांबळे समन्वयक मदत कक्ष मुंबई,चेतन सुतार ठाणे,डाँ.गणेश मडावी,श्रीनिवास बंडमवार, सुभाष घुटे तालुका प्रमुख अहेरी व पेरमिली आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.अहेरी शिवसेना तालुका प्रमुख सुभाष घुटे यांच्या प्रयत्नाने आरोग्य शिबीर यशस्वी झाल्याने व नागरिकांना मोफत चष्मे मिळाल्याने त्यांचे कौतुक केले आहे.हे शिबीर गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात पुढील १० दिवस सुरू राहणार असल्याची माहीती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.











