अधिकारनामा ऑनलाईन
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : स्थानिक सुप्रसिद्ध डॉ.एच.एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधान सभेचे सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा 123 वा जयंती महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून दिनांक 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उत्साहात संपन्न करणार असल्याची माहिती डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. किरण खंडारे यांनी पातूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली असून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे.सकाळी संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण प्रभारी प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा श्री शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य प्रा. अशोक सिंह रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या आजीवन सदस्य व प्राध्यापक हिम्मतराव सपकाळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय तहसीलदार पातुर, हरीष गवळी ठाणेदार पोलिस स्टेशन पातुर उपस्थित राहणार आहेत त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे त्यामध्ये ग्रंथप्रदर्शन हस्तकला प्रदर्शनी विज्ञान प्रदर्शनी पोस्टर प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन हे पुस्तक प्रदर्शनी आदींचा समावेश करण्यात आला आहे.यानंतर मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन आणि क्रीडा स्पर्धाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.यावेळी स्पर्धेचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार समारंभाचे उद्घाटन दादाराव हुशंगाबादे माजी प्राचार्य तथा आजीवन सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कांबळे माजी प्रा.श्रीमती आरडीजी महाविद्यालय अकोला यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव नाभरे अध्यक्ष रेणुका देवी संस्थान पातूर, विजयसिंह गहलोत बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर, डॉ. प्रकाशराव अंधारे माजी शिक्षणाधिकारी माध्यमिक सदस्य महाविद्यालय विकास समिती पातुर हे राहणार आहेत.दुपारी 2 वाजता आरोग्यविषयक मार्गदर्शन होणार आहे यामध्ये डॉ. सुनीता कदम स्वर्गीय डॉ.वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय पातूर “आयुर्वेदानुसार शरीर स्वास्थांमध्ये आहार व योगाचे महत्व ‘”या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत दुपारी 3 वाजता सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने रक्तगट तपासणे व मधुमेह निदान शिबिराचे आयोजन केले आहे.त्यानंतर डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन व कार्य याविषयी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
29 डिसेंबर रोजी “ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पातुर “या विषयाची एक चित्रफीत दाखवणार आहेत त्यानंतर डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जीवनपट दाखविणार आहेत त्यानंतर ऑनलाईन शिक्षणाचा अविष्कार विद्यार्थ्यांसाठी “तारक की मारक” या विषयावर वाद विवाद स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबरोबरच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य विचार वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.सोबतच कविसंमेलन, प्रश्नमंजुषा ,भावगीत स्पर्धा तसेच संगीत मैफिल आयोजित केलेले आहे त्यानंतर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर विचार परीक्षेचे आयोजन केले आहे.गुरुवार 30 डिसेंबर रोजी दिलीप राव इंगोले कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या हस्ते आवार भिंतीचे अनावरण व विद्यार्थी भांडार गृहाचे चे उद्घाटन होणार असून यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय किरण सरनाईक शिक्षक आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 वाजता समारोप आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिलीपराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपस्थिती माननीय किरणजी सरनाईक आमदार प्रमुख उपस्थिती डॉ.रामेश्वर पुरी अधिकारी बाळापुर प्रा. अशोक रघुवंशी सदस्य महाविद्यालय विकास समिती, श्रीकृष्ण भुस्कुटे महाविद्यालय विकास समिती तथा शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य ,गुलाबराव ताले पाटील आजीवन सदस्य शिवाजी शिक्षण संस्था, दादाराव देशमुख कृषीभूषण आजीवन सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती,माननीय श्रीकृष्ण रावजी भुस्कुटे सदस्य महाविद्यालय विकास समिती पातुर,शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य गुलाबराव पाटील सदस्य शिवाजी शिक्षण संस्था तथा महा विद्यालय विकास समिती पातुर, विलासराव हरणे सदस्य शाळा समिती अकोला शिवाजी हायस्कूल अकोला.
सदर कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. रोनील आहाळे, सहसमन्वयक डॉ. दिपाली घोगरे हे काम पाहणार आहेत कार्यक्रमासाठी डॉ. विनायक वसू, प्रा.हर्षल एकबोटे, डॉ.संजय खादेल, प्रा.अतुल विखे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. असून पत्रकार परिषदेमध्ये डॉ. सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण खंडारे यांनी सविस्तर माहिती दिली आहे यावेळी पातूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला देवानंद गहिले,जयवंत पुरूषोत्तम, संजय गोतरकर, गोपाल बदरके, अविनाश पोहरे, संतोष कुमार गवई, निशांत गवई, आदी मान्यवर पत्रकारांची उपस्थिती होती.यावेळी पत्रकार परिषदेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महाविद्यालयाच्या विकास कामावर पत्रकार परिषदेमध्ये चर्चा झाली.