किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप देऊळगाव येथे उत्साहात संपन्न. प्रतिनिधी /पातुर तालुक्यातील देऊळगाव येथे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ पठनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. ग्रंथ समारोप आज दिनांक 19 नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न झाला व ग्रंथ पठण गावातील उपासक गजानन भाऊ उपर्वट यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून ग्राम पंचायत सरपंच पंकज सोळंके उपसरपंच संतोष बराटे, तंटामुक्त अध्यक्ष निलेश भाऊ उपर्वट माझी सरपंच धनंजय भाऊ उपर्वट प्रदीप उपर्वट, रामेश्वर उपर्वट शांताराम उपर्वट ऋतीक अंभोरे आनंद उपर्वट प्रतीक उपर्वट, मिलिंद उपर्वट, पंकज उपर्वट, संदीप उपर्वट,राहूल घनमोळे, आदी उपस्थित होते सायंकाळी सुप्रसिद्ध भीम गीत गायक गौतम अंभोरे, राहुल तेलगोटे आणि सिमाताई धांडे यांच्या संच यांनी भीम गीत गायन करून सामाजिक प्रबोधन केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुगत व्याम शाळा यांनी अथम परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला











