माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर.
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला उपेक्षित, दुर्लक्षित, समाजाच्या भल्यासाठी मा. छगनराव भुजबळ साहेबांनी अहोरात्र कष्ट घेतले असून पुन्हा या समाजाची सेवा करण्यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो असे उद्गार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रा तुकाराम बिडकर यांनी काढले. अकोला जिल्ह्यात ना भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला, प्रसंगी ते बोलत होते. अकोला जिल्हा महात्मा फुले समता परिषद (ग्रामीण व महानगर) यांच्या वतीने आयोजित मा. भुजबळ साहेबांच्या वाढदिवसां निमित्त सूर्योदय बालगृह मलकापूर अकोला येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा सदाशिव शेळके, महानगर अध्यक्ष प्रा श्रीराम पालकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मायाताई इरतकर, महानगर कार्याध्यक्ष उमेश मसने, जिल्हा महिला कार्याध्यक्षा दीपमाला खाडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा विजय उजवणे, महानगर सचिव अनिल मालगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा दिलीप अप्तुरकर, श्री राजदत्त मानकर, सुभाष वाइंदेशकर, लक्ष्मण निखाडे, खाडे, महिला संघटिका सुदेष्णा नावकर, महिला उपाध्यक्ष प्रतिभा शिरभाते, रामदास खंडारे, बाळकृष्ण काळपांडे, बहादुरे साहेब, राहुल वरोकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी समता परिषदेच्या पदाधिकारी यांनी ना भुजबळ साहेबांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ बालक दत्तक योजनेचा संकल्प करण्याचे ठरविले. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सदाशिव शेळके यांनी केले संचलन प्रा अशोक भराड यांनी केले तर प्रा पालकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.