विद्यार्थी आघाडीचा युवकांना प्रेरणादायी संदेश
किरणकुमार निमकंडे / अकोला
पातूर : बेपत्ता असलेल्या आपल्या पतीच्या शोधामध्ये आलेल्या आणि भटकंती होत असलेल्या एका निराधार महिलेला पातुर पत्रकार व पोलीस बॉईज संघटना यांनी योग्य माहिती योग्य चौकशी व आर्थिक आधार देऊन तिला अकोला येथे एका वाहनांमध्ये बसवून दिल्याने या महिलेने पातूर येथील कर्तव्यदक्ष पत्रकार व जागरुक पोलीस बॉईज संघटना यांचे विशेष आभार मानले आहेत बुधवारी पन्नास वर्षे वय असलेली ही महिला पातुर चे नवीन बस स्थानका समोर आली व वाहनांना हात दाखवत होती मात्र कुठलेही वाहन तिच्यासाठी थांबले नाही कारण कारण या रस्त्यावर सर्वत्र अंधार होता डॉक्टर सिन्हा कॉलेज च्या समोर असलेल्या मृत्यूच्या खांबावरील लाईट सुद्धा बंद होते तसेच तिच्याकडे कुठल्या प्रकारचे पैसे नव्हते आणि ची पिशवी कोणीतरी अज्ञात इसमाने लंपास केली असे या महिलेने माहिती दिली रात्री आठ वाजले होते त्यामुळे या महिलेला अकोला कसे जावे हे कळत नव्हते त्यामुळे ती महिला अकोला रस्त्याकडे पायी निघाली होती तिच्याकडे अनेक कागदपत्रांची दस्तावेज होते.ती पिशवी घेऊन आपल्याकडे वाहनधारकांना हात दाखवत समोर जात होती मात्र कुठले वाहनाने तिला लिफ्ट दिली नाही त्यामुळे ती बरेच अंतरावर अंधारामध्ये निघून गेली पातूरच्या नवीन बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या जागरुक पत्रकार देवानंद गहिले तसेच पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष अर्जुन सिंग गहिलोत तसेच उपाध्यक्ष अविनाश पोहरे पातूर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच प्राध्यापक बिपिन पवार आदींनी या महिलेची चौकशी केली सदर महिला निराधार असल्याचे दिसून आल्यावरून या महिलेला या महिलेच्या विनंतीवरून योग्य माहिती दिली या महिलेने सकाळपासून जेवण केले नव्हते या महिलेला कुठलाही आधार नसल्याचे या महिलेने सांगितले या महिलेला घर सुद्धा नाही उघड्यावर ही महिला अकोला येथे राहते असे तिने सांगितल्यावर पातूरच्या या जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेला आर्थिक मदत दिली आणि एका खासगी वाहनांमध्ये अकोल्याकडे रवाना केले त्यामुळे या महिलेच्या डोळ्यात अश्रू आले होते या महिलेने या जागृत कार्यकर्त्यांचे मनोमन आभार मानले” एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे एकमेकाला सहकार्य केले तर या जीवनातून दुःख नाहीसे होईल आणि मानवतावादी विचार प्रगल्भ होतील वाटसरू महिलावर कुठले प्रकारचा अन्याय अत्याचार याला पायबंद बसेल त्यामुळे ही केलेली मदत आदर्श आणि इतरांना प्रेरणा देणारी आहे.