सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील सारसिव गावातील तरुणांना व्यायाम करण्यासाठी व्यायाम शाळेची स्थापना झाली आहे शाळेच्या नावाखाली लाखो रुपयाच्या शासनाचा निधी घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी. अशी मागणी सारशिव येथील मनीष दादाराव जाधव यांनी मा.जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या तक्रार अर्ज करून मौजे सारशिव येथे पाच ते सात वर्षापूर्वी व्यायाम शाळेच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी हडप केला असून सारशिव येथील व्यायाम शाळा ही पडीत अवस्थेमध्ये आहेत मात्र कागदोपत्री लाखो रुपयाचे बिल हडप केल्याचा आरोप करून आजपर्यंत गावातील तरुणांनी लाभ ही घेतला नाही व व्यायाम शाळेमध्ये जाण्या येण्याचा रस्ता नाही व व्यायाम शाळेवर तिने पत्रे काहीच नाही व साहित्य कुठे गायब आहे अद्याप याचा शोध नाही करिता अशा बोगस व्यायाम शाळेवर व संस्थाचालकांवर चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनीष जाधव यांनी दिला आहे.