सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपुर
बुलढाणा.रायपूर जिल्हा परिषद सर्कल च्या समस्या बाबत चिखली विधानसभा चे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या निवासस्थानी छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीत रायपूर जिल्हा परिषद सर्कल च्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली.सदर बैठकीत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे रायपूर येथे ग्रामीण रुग्णालय तसे वाडी व पांगरी उबरहंडे येथे महावितरणचे पावर स्टेशन चे कामासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत आमदार श्वेता ताई महाले पाटील, मोहन पवार ,भागाजी पाटील, कैलास भाऊ दुधा, डॉक्टर राजेश्वर उबरहंडे, शंकर भाऊ तरमळे ,कृष्ण भाऊ लकडे ,साहेबराव काका गवते पिंपळगाव सराई पंचायत समिती सदस्य संदीप भाऊ उगले, रेहान संजरी, दत्ता भाऊ शेवाळे, केशव तरमळे ,महंमद खालिद ,संदीप भाऊ सोनवणे ,आकाश काळे पाटील, व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.