गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा येथे देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्त्य साधून सेवा व समर्पण अभियान अंतर्गत माजी केंद्रीय राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे,भाजप जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर,अकोट मतदार संघाचे आ प्रकाश भारसाकळे,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड, तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, शहर अध्यक्ष महेंद्रजी गोयनका,नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख ,जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांचे मार्गदर्शनाखाली भाजयुमो तेल्हारा तालुका व शहर चे वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद शाळा क्र 1 येथे नगरसेवक तथा भाजप गटनेते नरेशआप्पा गंभीरे, नगरसेवक गनिभाऊ शहा ,भाजप तेल्हारा शहर उपाध्यक्ष बाळू पवार यांचे सहकार्यातून व भाजयुमो अकोला जिल्हा सचिव सुमीतआप्पा गंभीरे ,तालुका अध्यक्ष पंकज देशमुख,शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांचे नेतृत्वात भाजयुमो तेल्हारा तालुका व शहर चे वतीने कोरोना लसीकरण शिबीर व कोविड योद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या लसीकरण शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.तसेच लसीकरण शिबीर समारोप करते वेळी कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला .त्यात नगर परिषदेचे सफाई कामगार,वैद्यकीय अधिकारी अशोक तापडिया सर ,डॉ राहुल सदाफळे, डॉ .इंगळे ,यांचे समवेत लॉकडाऊन च्या काळात शहरातील गोरगरिबांना दररोज अन्न पुरविणारे जय बजरंग मंडळ,व आसरा माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला भाजपचे सर्व नगरसेवक ,भाजप तेल्हारा तालुका व शहर पदाधिकारी यांचे समवेत भाजयुमो जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार,भाजयुमो जिल्हा सचिव विशाल कोकाटे,जिल्हा सहसचिव दिलीप पवार,जिल्हा चिटणीस सतीश कोरडे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अक्षय जोशी,तालुका सरचिटणीस विजय बोर्डे, तालुका उपाध्यक्ष धिरज बकाल विठ्ठल चव्हाण,राहुल फाटे, कुणाल शेळके,आशिष माने,शिवा खाडे, वृषभ ठाकूर,धीरज नेमाडे,शुभम ढेंगे,विठ्ठल चव्हाण,अनिकेत बकाल,रफिक कुरेशी,सलीम शहा,यांचे समवेत भाजयुमो तेल्हारा तालुका व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते


